याडं लागलं गं याडं लागलं गं
- artist sachin
- Jul 7, 2019
- 2 min read
जीथं तिथं रुप तुझं दिसु लागलं...
देवा तुझ्या नावाचं रं याडं लागलं..!

अवतार हा गयासुर नावाच्या राक्षसाच्या समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता. त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भुलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते. यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते . नंतर त्याचा परमभक्त जो पुंडलिक यास भेटून स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते.
“ पांडुरंग माहात्म्य
आजवर जी पांडुरंग माहात्म्ये उपलब्ध आहेत, त्यांत संस्कृतमधील स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णू पुराण यांतील तीन माहात्म्ये आहेत. मराठी भाषेत श्रीधर नाझरेकर, प्रल्हाद महाराज बडवे आणि गोपाळबोधो यांनी लिहिलेली माहात्म्ये प्रसिद्ध आहेत. शिवाय आणखीही काही माहात्म्ये आहेत.
मराठी कवी श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी मराठी भाषेत पांडुरंग माहात्म्य रचले तो काळ इ. स. १६९० ते १७२० दरम्यानचा आहे. मात्र तेनाली राम यांनी रचलेले तेलुगू पांडुरंग माहात्म्य त्यापूर्वी म्हणजे इ.स. १५६५चे आहे. संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांप्रमाणेच तेलुगू भाषेतही पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक महाकाव्य म्हणून तेनाली राम यांच्या ‘पांडुरंग माहात्म्य्यनु’या रचनेचा उल्लेख केला जातो. तेनाली राम यांचे माहात्म्य स्कंद पुराणावर आधारित आहे. या काव्याचे पाच आश्वास (अध्याय) आहेत. शिव-पार्वती संवादातून या तेलुगू पांडुरंग माहात्म्याचे कथानक उलगडते. या माहत्म्यात दक्षिणतीरी पौंडरिक क्षेत्र असल्याचा उल्लेख आहे. हे महाकाव्य दक्षिणी भारतात भाविकांच्या पठणाचा भाग आहे.”
दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते. प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते. आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो
Comments